Subject: निर्णय चुकतात
निर्णय चुकतात
आयुष्यातले
आणि
आयुष्य चुकत जाते..
प्रश्न कधी कधी
कळत नाहीत
आणि
उत्तर चुकत जाते..
सोडवताना वाटतं
सुटत गेला गुंता..
पण
प्रत्येक वेळी
नवनवीन गाठ
बनत जाते
दाखविणाऱ्याला
वाट माहित नसते..
चालणाऱ्याचे ध्येय
मात्र हरवून जाते..
दिसतात तितक्या
सोप्या नसतात
काही गोष्टी..
"अनुभव"
म्हणजे काय हे
तेव्हाच कळते...
असे मित्र बनवा
जे कधीच
साथ सोडणार नाही..
असे प्रेम करा
ज्यात
स्वार्थ असणार नाही..
असे हृद्य बनवा
कि ज्याला
तडा जाणार नाही..
असे हास्य बनवा
ज्यात
रहस्य असणार नाही..
असा स्पर्श करा
ज्याने
जखम होणार नाही..
असे नाते बनवा
ज्याला
कधीच मरण नाही..
आयुष्य थोडसच असावं
पण...
आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं
पण...
जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं
की...
घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी
की...
स्वार्थाचंही भानं नसावं,
आयुष्य असं जगावं
की...
मृत्यूनेही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर....!!!!
माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय.. जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूच येण मात्र अकस्मात असत.. कारण त्याला माहितीय, माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत नाही..
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!
विश्वास उडाला की आशा संपते!
काळजी घेण सोडल की प्रेम संपत!
म्हणुन, स्वप्न पाहा,
विश्वास ठेवा,
आणि काळजी घ्या!
आयुष्य खुप सुन्दर आहे.
No comments:
Post a Comment